शिक्षिका कल्पना उपर्वट यांचा जॉयंटस सहेलीतर्फे सत्कार

खामगाव प्रतिनिधी । येथील मेहता नवयुग विद्यालयाच्या शिक्षिका कल्पना उपर्वट यांचा शिक्षक दिनानिमित्त जॉयंटस सहेली गृपच्या वतीने सत्कार करण्यात आला.

जॉयंट्स इंटरनॅशनल फेडरेशन यांच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रुपच्या अध्यक्षा नीला अग्रवाल होत्या तर प्रमुख अतिथी सरबजीत कौर सलुजा होत्या. सर्वप्रथम डॉ सर्वपल्ली राधाकृषणन् यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आला. मुख्य मार्गदर्शन करतांना सरबजीत कौर सलुजा यांनी शिक्षक हे आपल्या जीवनाचे शिल्पकार असतात. त्यांनी केलेले संस्कार हे विद्यार्थ्यांच्या मनात रुजत असतात व त्यावरच त्याचे पुढील आयुष्य घडत असते त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्याचे कार्य प्रामाणिकपणे करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषण करतांना नीला अग्रवाल यांनी आपल्या जीवनात गुरूंचे स्थान किती महत्वाचे आहे, हे कथन केले. यावेळी जी.वी. मेहता नवयुग विद्यालयात कार्यरत असलेल्या शिक्षिका कल्पना उपर्वट यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देताना शिक्षिका उपर्वट म्हणाल्या की, आम्ही विद्यार्थ्याची पिढी घडवीत असताना आमच्या स्वतःच्या मुलाप्रमाणे समजतो, प्रसंगी रागावतो, त्यांच्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो, ज्यामुळे त्या चुका पुन्हा जीवनात त्याने करू नये. त्या रागावण्यामागे माया असते, प्रेम असते, त्यामुळे समाजाने शिक्षकांचा सन्मान राखला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून ग्रुपचे सर्व शिक्षकांचे वतीने धन्यवाद मानलेत यावेळी ग्रुपच्या सचिवा

रेखा केजडीवाल यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन गीता बयस यांनी केले. कार्यक्रमास अनेकांची उपस्थिती होती.

 

Protected Content