Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिक्षक व शिक्षकेतर महासंघाची नूतन कार्यकारणी घोषित

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाची जळगाव तालुका नूतन कार्यकारणी घोषित करण्यात आली. यात अध्यक्षपदी निलेश मोरे, उपाध्यक्ष प्रतिक्षा पाटील, केतन बहाटे आणि सचिवपदी राहूल चौधरी यांची निवड करण्यात आली आहे.

गुरुवार, दि ३१ मार्च रोजी महासंघाच्या जळगाव तालुक्यातील खाजगी प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली.

सभेच्या अध्यक्षस्थानी उत्तमराव चौधरी व निरीक्षक म्हणून माजी विभागीय उपाध्यक्ष एम.व्ही.पाटील यांची उपस्थिती होती.

अशोक मदाने राज्य उपाध्याक्ष, राज्य सदस्य टी.के.पाटील, जिल्हाध्यक्ष हेमंतकुमार पाटील, जिल्हा सचिव देवेन्द्र चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष शाम ठाकरे, अख्तरउद्दिन काझी, अजित चौधरी, गोविंदा लोखंडे, कैलास तायडे, प्रफुल्ल सरोदे यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. सभेचे प्रास्ताविक हेमंत पाटील यांनी केले सभेत मागील कार्यकारणीचा कार्याचा आढावा घेण्यात आला. अजित चौधरी यांनी आढावा सादर केला.

सभेत सर्वानुमते नूतन कार्यकारणी

अध्यक्ष – निलेश मोरे

उपाध्यक्ष – प्रतीक्षा पाटील,

उपाध्यक्ष – केतन बहाटे

सचिव – राहुल चौधरी

सहसचिव – सोमनाथ लोखंडे

हिशोब तपासणीस – सागर झांबरे

संघटक – कैलास थोरवे

खजिनदार – कल्पना सोनवणे

प्रसिद्धी प्रमुख – विनोदकुमार शेलवडकर,

महिला प्रतिनिधी – सुषमा गायकवाड, लिना चौधरी, हर्षाली पाटील

शिक्षकेतर प्रतिनिधी – सुनील नारखेडे

कार्यकारणी सदस्य – सय्यद जाकिर अली आबिद अली, जाकिर हुसेन शेख अहमद, जुबेर अहमद शेख मुसा, निखिल जोगी, सागर पाटील, राहुल सोनवणे, ज्ञांनेश्वर पाटील, दीपक भारंबे, राहुल पाटील, सागर पाटील, स्वप्नील पाटील, लिनेश खडके

 

Exit mobile version