Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शनीपेठ परिसरातून तवेरा कारची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शनीपेठ परिसरातील मायका देवी मंदीरसमोर डीपीजळून एकाची तवेरा कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, दानिश खान अब्दुल्ला खान (वय-३०) रा. बटाटा गल्ली,  शनिपेठ हे आपल्या कुटुंबियांचा वास्तव्याला आहे. तवेरा चारचाकी वाहन चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या मालकीची (एमएच १९ एएक्स ७६६७) तवेरा गाडी आहे. २४ जून रोजी मध्यरात्री १२.३० वाजता त्यांनी त्यांची तवेरा कार शनीपेठ मधील मायका देवी मंदिरासमोरील डीपीजवळ पार्क करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कार चोरून नेल्याचा प्रकार सकाळी ८.३० वाजता उघडकीला आला. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतु तवेरा कार कुठेही आढळून आले नाही. अखेर शनिवारी २५ जून रोजी दुपारी २ वाजता शनिपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक मनोज येऊलकर करीत आहे.

 

Exit mobile version