टाटा मॅजिकची झाडाला धडक : एक ठार, तर दुसरा गंभीर जखमी !

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शहापूर येथे टाटा मॅजिक वाहन झाडाला धडकल्यामुळे झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे.

शहरापासून जवळच शहापूर रस्त्यावर रात्रीच्या सुमारास मॅजिक रिक्षा गाडीचा झाडाला धडक दिल्यामुळे वाहक आनंदा भीमराव जगताप ( राहणार भारुडखेडा ) यांच्या मृत्यू झाला असून दीपक मुरलीधर शेळके ( राहणार भारुडखेडा ) हा गंभीर जखमी झाला आहे.

रात्री अडीच वाजेच्या सुमारास मयत आनंदा जगताप व दीपक शेळके हे दोघेजण मॅजिक रिक्षा घेऊन जामनेर कडून शहापूर कडे जात असताना रिक्षा वरील ताबा सुटल्यामुळे रिक्षा रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकली. या घटनेमध्ये आनंद भीमराव जगताप यांच्या मृत्यू झाला असून दीपक शेळके गंभीर जखमी झाले आहे त्यांच्यावर जळगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेबाबत जामनेर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Protected Content