Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरुणाचे मारहाणीत नाक फ्रॅक्चर !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथे काहीही कारण नसतांना तरूणाला लोखंडी वस्तूने मारहाण करून नाक फ्रॅक्चर करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशिराबाद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सैय्यद हर्शद अली शेख (वय-१८) रा. ताजनगर, डीपीजवळ, नशिराबाद हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २१ मे रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास शहरातील परकोट मोहल्ला येथे सैय्यद हर्शद अली शेख हा उभा होता. त्यावेळी काहीही एक कारण नसतांना त्याच्या गल्ली राहणारे नाजीम रहीम शेख (वय-२१), रहिम शेख फरीद (वय-३५), शेर अली सैय्यद अली (वय-२८) आणि अरबाज अली सैय्यद अली (वय-२४) सर्व रा. परकोट मोहल्ला यांनी येवून बेदम मारहाण केली. यातील एकाने सैय्यद हर्शद अली शेख याच्या नाकावर लोखंडी वस्तू मारल्याने नाक फ्रॅक्चर केले. त्याला तातडीने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सोमवारी २३ मे रोजी रात्री साडे अकरावाजता संशयित आरोपी नाजीम रहीम शेख, रहिम शेख फरीद, शेर अली सैय्यद अली आणि अरबाज अली सैय्यद अली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युनूस शेख करीत आहे.

Exit mobile version