अरे व्वा..आता तरसोदच्या बाप्पाचे दर्शन ॲपद्वारे करता येणार; जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते ॲपचे लोकार्पण

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील तरसोद येथील गणपती हे जगभरातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. गणपतीचे भाविकांना घरबसल्या दर्शन व्हावे यासाठी विश्वस्त मंडळाच्या वतीने डिजिटल ॲपची निर्मिती केली आहे. ॲपद्वारे भाविकांना घरबसल्या मोफत गणपती बाप्पाचे दर्शन होणार आहे. या ॲपचे नुकतेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.

कोरोना काळात सर्व धार्मीक स्थळे बंद करण्यात आले होते. त्यावेळी भाविकांना तरसोद येथील गणरायाचे दर्शन करता आले नव्हते. भाविकांच्या सोईसाठी श्री गणपती मंदीर संस्थान तरसोदच्या वतीने विशेष सेवा उपलब्ध सेवा ॲपद्वारे करून दिली आहे. ॲपच्या माध्यमातून भाविकांना घरबसल्या ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. मंदीरातील विविध सण, कार्यक्रम आणि अद्यायावत माहितीही उपलब्ध होणार आहे.  https://tarsodganpati.in

याप्रसंगी गणपती संस्थानचे अध्यक्ष चंदन अत्तरदे, ट्रस्टी अशोक राजपूत, मिलन मेहता, रूपेश चिरमाडे आणि ॲप डेव्हलपर्स किशोर खडसे आदी उपस्थित होते.

Protected Content