Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तारक मेहता फेम गुरूचरण सिंह सोढी ११ दिवसांपासून बेपत्ता

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत रोशन सिंह सोढी भूमिता साकारत घरा-घरात पोहोचलेला अभिनेका गुरुचरण सिंह गेल्या ११ दिवसांपासून बेपत्ता आहे. अभिनेत्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही आहे. पोलीस अभिनेत्याचा कसून तपास करत आहे. पण अद्याप पोलिसांना यश मिळालं नाही. गुरुचरण सिंग याच्याबद्दल कोणतीच माहिती समोर येत नसल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अभिनेत्याचं खरंच अपहरण झालं आहे की, कट रचण्यात आला आहे? असे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. बेपत्ता झाल्यानंतर गुरुचरण सिंग याला २२ एप्रिल रोजी पाहण्यात आले. त्याच्या वडिलांनी चार दिवसांनंतर अभिनेता बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली, ‘माझा मुलगा गुरुचरण सिंग, वय: 50 वर्षे, 22 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजता मुंबईला निघाला. तो विमान पकडण्यासाठी विमानतळावर गेले. तो ना मुंबईला पोहोचला ना घरी परतला. तो मानसिकदृष्ट्या स्थिर असून आम्ही त्याचा शोध घेत होतो, पण आता तो बेपत्ता आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगली आहे.

दिल्ली पोलिसांची एक टीम आता मुंबईत पोहोचली असून लवकरच मुंबई पोलिसांसह शोध सुरु करणार आहेत. पोलीस सर्वातआधी गुरुचरण सिंग याच्या मुंबईत मलाड याठिकाणी असलेल्या घराची आणि मित्र-मंडळींची देखील चौकशी करणार अशी माहिती देखील मिळत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गुरुचरण सिंग याची चर्चा रंगली आहे. आता अभिनेत्याबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘गुरुचरण सिंग यांने स्वतःचा फोन पालम भागात फेकून दिला. आम्ही त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. पण अद्याप ठोस पुरावा हाती लागलेला नाही. अभिनेत्याकडे फोन नाही…’ असं पोलीस म्हणाले.

पुढे मिळालेल्या माहितीनुसार, ‘सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे मोठी माहिती मिळाली आहे. अभिनेता सतत एका ई-रिक्षातून दुसऱ्या ई-रिक्षातून जाताना दिसला. त्याने सर्वात आधी योजना आखली त्यानंतर दिल्लीबाहेर गेला.. असं वाटत आहे…’ आता नक्की सत्य काय आहे, ते अभिनेता पोलिसांच्या हाती लागल्यावर कळेल.

Exit mobile version