Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तांदळवाडी येथे दोन वाटर कूलरचे उद्घाटन

tandal gaon

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील आदर्श सरपंच श्रीकांत महाजन यांनी गावकऱ्यांची तहान भागवावी, यासाठी वर्दळीच्या ठिकाणी दोन डिफ्रीज वॉटर मशीन (14 जुलै) रविवार रोजी बसविण्यात आल्याने प.पु.स्वामी जनार्दन हरिजी, प.पु. मानेकर शास्त्री तसेच जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते डीफ्रीजचे लोकार्पण करण्यात आले.

तांदलवाडी येथील राम मंदिर परिसर व सुभाषचंद्र बोस चौकात दोन डीफ्रीज गावकऱ्यांच्या सेवेत दाखल झाले आहे. तालुक्यातील आदर्श गाव तांदलवाडी म्हणून ओळखले जाते. शेती प्रमुख व्यवसाय असलेल्या गावात केळीच्या माध्यमातून समृद्धी आली आहे. या ठिकाणची केळी देशाबाहेरच्या बाजार पेठेत निर्यात केली जाते. येथील सरपंच श्रीकांत महाजन दुसऱ्यांदा सरपंच पदाची धुरा समर्थपणे सांभाळत असून, त्यांच्या व्हिजनमुळे गावाचा चांगला विकास झाला आहे. गेल्या चार वर्षाचे सरपंच मानधन ६३ हजार व ग्रामपंचायत सदस्यांचा भत्ता ४२ हजार रुपये व्यक्तिगत कामांसाठी न खर्च करता, सर्वांनी या मानधनाच्या रक्कमेतून गावात दोन डीफ्रीज बसविण्यात आले आहे. या निर्णयाने ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे गावातून कौतुक केले जात आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, प.सं.सदस्या कविता कोळी, पोलीस पाटील, सुधाकर चौधरी, किरण नेमाडे(खिर्डी), हरलाल कोळी, उपसरपंच वंदना तायडे, सदस्य मानसी पाटील, नारायण पाटील, नितीन महाजन, सुनील चौधरी, अरुण पाटील, गोकुल झाल्टे, जितेंद्र महाजन, उदयभाय तायडे, गोकुळ चौधरी, नितीन सपकाळे, अरुण महाजन, प्रल्हाद पाटील, दत्तात्रय तायडे, राहुल पाटील, गोपाळ पाटील, सुमित पाटील, सुबोध महाजन, डॉ.वैभव पाटील, गणेश नामायते, मनोहर पाटील, प्रशांत महाजन, अंकुश महाजन, श्रीराम ठाकूर, डी.सी.पाटील, उदय चौधरी, विठ्ठल चौधरी, रमेश उन्हाळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version