Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तणाव मुक्तीसाठी मनोरंजन व विचारांची देवाणघेवाण करा ; डॉ. साळुंखे

 

भुसावळ प्रतिनिधी । येथील नाहाटा महाविद्यालयात आज ज्ञानरत्न पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. सध्याच्या धावपळीच्या युगात सर्वांना ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. याची मुळापासून सुटका करण्यासाठी ज्ञान, मनोरंजन व समुहात राहून विचारांची देवाणघेवाण करायला हवी, असे प्रतिपादन जेष्ठ अधिव्याख्याता डॉ. चंद्रकांत साळुंखे यांनी केले.

 

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. 10 व्यक्तींना ज्ञानरत्न पुरस्कार – ज्ञानासह मनोरंजन गृपतर्फे 10 व्यक्तींना उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ व मोत्यांची माळ देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यात  मुख्याध्यापक अरूण धनपाल, मुख्याध्यापक सुनिल भिरूड, डॉ. खेमचंद्र बोरोले, रोहिदास सोनवणे, दिनेश देवरे, दंगल पाटील, प्रा.समाधान पाटील, शैलेंद्र वासकर, कैलास तांबट व प्रशांत ढाके यांचा समावेश होता. तसेच विशेष सत्कारार्थी म्हणून दिलीप वैद्य, सुनिल वानखेडे, बी.बी. जोगी, प्रा.दिलीप ललवाणी, शामकांत रूले, प्रमोद आठवले, डॉ. शुभांगी राठी, राजेंद्र जावळे यांचा सन्मान करण्यात आला.  यावेळी व्यासपीठावर माध्यमिक शिक्षण सभापती मंगला आवटे, प्राथमिक शिक्षण सभापती ॲङ तुषार पाटील, भुसावळ विभागाचे डाक अधिक्षक पी.बी.सेलूकर, प्रा.डॉ.अनिल झोपे, गृपप्रमुख डॉ.जगदीश पाटील यांची उपस्थिती होती. तसेच प्रमुख पाहुणे मंगला आवटे यांनी मानवी जीवनातील शिक्षणाचे महत्व पटवून दिले. ॲड. तुषार पाटील यांनी शैक्षणिक व सामाजिक चळवळ म्हणजे समाज परिवर्तनाची नाळ असल्याचे सांगितले. पी.बी. सेलूकर यांनी समूहाचे महत्व विशद करून डाक विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. अध्यक्षीय मनोगत डॉ. चंद्रकांत साळुंखे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन मनिषा ताडेकर यांनी तर आभार नयना ढाके यांनी मानले. यशस्वीतेसाठी ज्ञानासह मनोरंजन गृपच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version