Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रस्त्यावर येऊन प्रश्न सोडवा — ना. गुलाबराव पाटील (व्हिडिओ)

 

 

जळगाव, सचिन गोसावी/संदीप होले ।  भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांचे भिक मांगो आंदोलन वेगळे असून आज लोक पैसे देण्यास तयार असून  रस्त्यावर येऊन प्रश्न सोडवाव असे  मत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असून आम्ही रस्त्यार आहोत त्यांचे आमदार पश्चिम बंगालमध्ये प्रचार करत असून तेथून भाषण करून पाठवत असल्याची टीका आ. गिरीश महाजन यांचे नाव न  घेता केली. मैदानात या, प्रश्न सोडवा, सूचना करा त्या नम्रपणे स्वीकारू टीका केल्याने  पोट नाही भरत त्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत अशी टीका ना. पाटील यांनी केली.

रेमडीसीव्हर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असला तरी सरकारी रुग्णालयात ते उपलब्ध असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.   खाजगी हॉस्पिटल यांनी ज्या रुग्णांना रेमडीसीव्हर इंजेक्शनची गरज आहे त्यांना ते वापरावे कारण यामुळे डोळे निकमी होणे, ब्रेन हॅमरेज सारखे आजार उद्भाविण्याचे प्रकार घडत असल्याचे ना. पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. जिल्ह्यासाठी  १० हजार रेमडीसीव्हर घेण्यासाठी नियोजन मंडळातून  १ कोटी रुपये मंजूरी दिली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात जळगावकरांना उपलब्ध केले जातील. केवळ खाजगी हॉस्पिटलमध्ये  रेमडीसीव्हरचा तुटवडा असून जिल्हाधिकारी, डीन यांना खाजगी हॉस्पिटलमधील रुग्णास खरेच रेमडीसीव्हरची गरज आहे का ? याची पाडताळणी करून उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच मला रेमडीसीव्हर द्या ही जी मानसिकता आहे ती बदलावी लागेल असे मत ना. पाटील यांनी मांडले. लॉक डाऊन संदर्भात निर्णय घेतल्यानंतर तो जाहीर केला जाणार असल्याने त्याबाबत तर्क वितर्क करणे चुकीचे असल्याचे ना. पाटील यांनी स्पष्ट केले.

 

 

 

Exit mobile version