Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पुण्यातील अवैध पबच्या विरोधात कडक कारवाई करा – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना शहरातील अवैध पबच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय अवैध पबसह बांधकाम नियमांचे उल्लंघन केल्या जाणाऱ्या अन्य इमारतींवरही बुलडोझर चालवावेत असे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या विधानात म्हटलेय की, पुणे शहराला ‘नशा मुक्ती शहर’ बनवण्यासाठी तस्करांच्या विरोधात नव्याने कारवाई सुरू करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

महाराष्ट्रातील दुसऱ्या मोठ्या शहरातील पब गेल्या 48 तासांपासून निशाण्यवर आहेत. खरंतर, पुण्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यामधअये काही तरुण ड्रग्जसारखा काही पदार्थांसोबत दिसून आलेय हा व्हिडीओ कथित रुपात फर्ग्यूसन कॉलेज रोजवर असणाऱ्या लिक्विड लीजर लाउंजचा असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या विधानात म्हटले की, पुण्याला नशा मुक्ती शहर बनवण्यासाठी सर्व अवैध पबच्या विरोधात कठोर कारवाई केला पाहिजे. यासाठी पुण्यातील पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निर्देश देत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, “शहरातील ड्रग्ज संबंधित सर्व अवैध बांधकांमांवर बुलडोझर चालवला पाहिजे.”

मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी ड्रग्ज विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई सुरु करण्यासह बांधकामाच्या नियमांचे उल्लंघन झालेल्या अवैध पब्स आणि इमारती पाडण्याचा निर्देश दिले आहेत. व्हायरल व्हिडीओचा पोलिसांकडून अधिक तपास केला असता या प्रकरणात एका इव्हेंट आयोजकासह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय उत्पादन शुल्क विभागागाने दारुच्या साठ्यासंदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली एल-3 च्या सहा वेटर्सना अटक केली आहे . प्रकरणात शिवाजीनगर पोलीस स्थानकातील एक पोलीस निरीक्षक, एक सहाय्यक निरीक्षक आणि दोन बीट मार्शल यांना निलंबिंत करण्यात आले आहे.

Exit mobile version