Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आक्षेपार्ह पोस्ट टाकून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक करवाई करा

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काश्मीर फाईल बघितल्यानंतर जे हेट स्पीच देवून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना होत आहे. तसेच आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याने दोन समाजात तेढ निर्माण होत आहे अश्यांना पकडून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन गुरूवारी ३१ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांना देण्यात आले.

 

जळगाव शहरातील एका बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सिनेमागृहात काश्मीर फाईल बघितल्यानंतर जे हेट स्पीच देऊन दोन समाजात तेढ निर्माण करणारी घटना जळगावात घडली आहे.  त्या घटनेला जबाबदार असलेल्या संस्थेला, हेट स्पीच देणाऱ्या महिलेला सदर हेट स्पीच पसरवणाऱ्या समाज माध्यमाचे प्रतिनिधींवर तसेच एका रिक्षा ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली. त्या रिक्षा ग्रुपच्या एडमिनला, प्रसारित करणाऱ्या व्यक्तीला भारतीय दंड विधान कायदा नुसार अजामीन पात्र कलमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी जळगाव शहरातील सर्वधर्मीय, राजकीय व सामाजिक संघटनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांना निवेदन देवून केली आहे.

 

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस सोशल फोरमच्या उपाध्यक्षा प्रतिभा शिरसाठ, महिला सुरक्षा समितीच्या निवेदिता ताठे, नसरुल फातेमा, जनक्रांती मोर्चाचे संस्थापक मुकुंद सपकाळे, लोकसंघर्ष मोर्चाचे भरत कर्डिले, वीर सावरकर रिक्षा युनियनचे दिलीप सपकाळे, जन क्रांतीचे वाल्मीक सपकाळे, छावा युवा मराठा महासंघाचे अमोल कोल्हे, मानियार बिरादरीचे प्रदेश अध्यक्ष फारूक शेख, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सरचिटणीस बाबा देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांक सेल मजहर पठाण, मनसेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महानगराध्यक्ष मुजीब पटेल यांच्यासह आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version