Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘ऑफलाईन’ नको ‘ऑनलाईन’ परीक्षा घ्या – मागणीसाठी राज्यभरातील विद्यार्थी रस्त्यावर (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीची परिक्षा ही ऑनलाईन पध्दतीने घेण्यात यावी या मागणीसाठी राज्यभरातून वेगवेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. राज्यातील मुंबई, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद आणि जळगावसह अनेक शहरामधील काही विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारा कुणी नेता किंवा या आंदोलनाला कोणत्याही राजकीय पक्षाचे पाठबळ नाही. तरी सोशल मिडीयावर एकमेकांना आवाहन करत सारे एकत्र आले आहेत. आता सरकार या दबावाला बळी पडणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यासंदर्भात अगोदरच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी, “सध्यातरी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने वेळापत्रकानुसारच होईल मात्र १५ फेब्रुवारीपर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाबाबत भूमिका घेत दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलायचा की नाही यावर निर्णय घेतला जाईल.” असे सांगितले आहे.

जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर देखील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत मोर्चा काढण्यात आला. दरम्यान जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेत ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करू नये’ असे आवाहन करत शांततेच्या मार्गाने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्याचे सांगून समजूत काढली. त्यांनतर विद्यार्थांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

व्हिडीओ लिंक – 1

व्हिडीओ लिंक – 2

Exit mobile version