Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जनावरांना होणाऱ्या आजारांवर उपाययोजना करा; राष्ट्रवादीचे बीडीओंना निवेदन

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यात काही दिवसांपासुन जनावर व पाळीव प्राण्यांवर लाळ्या खूजगट, लंपी, स्क्रीन डिसीज या संसर्जन्य आजारांच्या प्रादुर्भाव वाढला आहे. या आजारांवर तातडीने उपाययोजना करून मोफत लसीकरण करावे, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रसचे यावल पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे यांना निवेदन दिले आहे.

 

यावल तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीसह पशूपालन हा प्रमुख व्यवसाय केला जातो. बदलत्या हवामानामुळे गाय, म्हशी, बैल, शेळी, मेंढी यांच्यावर तोंडखुरी, पायखुरी, लाळ्या खूजगट, लंपी स्किन डिसीज या सारखे साथीचे संसर्गजन्य आजार वाढलेले दिसून येत आहे. हा आजार दिवसेंदिवस वाढत असून रोगामुळे शेतकरी व पशुपालकामध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.  पंचायत समितीच्या आरोग्य विभागातील  कर्मचाऱ्याची व पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या कमी असल्याने याचे योग्य नियोजन करून संपूर्ण यावल तालुक्यातील पशुसंवर्धन संरक्षण उपाय योजना कराव्यात, आधीच यावल तालुक्यातील शेतकरी, पशुपालक करोना, नापिकी, दुष्काळी, पिकांना भाव नसल्याने  अडचणीत आहे. त्यात पशुधन वाचवणे व खूप आवश्यक आहे. लवकरात लवकर यावल तालुक्यात जनावरांना मोफत लसीकरण मोहीम राबवावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस यावलच्या वतीने करण्यात आली आहे.

 

या निवेदनावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऍड देवकांत पाटील, शहराध्यक्ष हितेश गजरे, समन्वयक किशोर माळी, कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, जिल्हा युवक सरचिटणीस विनोद पाटील, तालुका उपाध्यक्ष पवन पाटील, शाखाध्यक्ष गिरीष पाटील आदींची स्वाक्षरी आहेत .

Exit mobile version