Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

म. फुले यांच्या स्मारकाच्या चबुतऱ्याची नासधूस : कारवाईची मागणी

धरणगाव, प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मारकाच्या चबुतऱ्याची नासधूस करणाऱ्यांच्या निषेधार्थ बहुजन क्रांति मोर्चा महात्मा फुले ब्रिगेड , सर्व राजकीय पक्ष , सामाजिक संघटना यांच्या वतीने तहसीलदार निवेदन देऊन दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की , काही दिवसापूर्वी दादर येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी राजगृहावर भ्याड हल्ला करण्यात आला. नंतर कुळवाडीभूषण छत्रपती शिवराय यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करण्यात आले आणि आता १४ जुलै , २०२० रोजी यवतमाळ येथील आझाद मैदानजवळच्या भारतातील थोर समाजसुधारक -स्त्री शिक्षणाचे जनक राष्ट्रपिता तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले स्मारकाच्या चबुतऱ्याची जागोजागी नासधुस केली. महापुरुषांची विटंबना करण्याचा हा साळसूदपणे केला जाणारा प्रकार असल्याचं जाणवत आहे. यामुळे सामाजिक वातावरण कलुषित करून जनमानसात संतापाची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न वारंवार होतोय. अशा या मनूवादी विकृत प्रवृत्तींचा वेळीच बंदोबस्त करून कठोर शासन करण्यात यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे करत करण्यात आली आहे. याप्रसंगी बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ , महात्मा फुले ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नरेंद्र महाजन तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ , लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी , बामसेफचे तालुकाध्यक्ष पी. डी. पाटील , छत्रपती क्रांति सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील , महात्मा फुले क्रांती मंचचे आर. डी. महाजन , माजी जि. प. उपाध्यक्ष जानकिराम पाटील , चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे , शिवसेनेचे राजेंद्र महाजन , काँग्रेसचे चंदन पाटील, राजेंद्र ठाकरे , मोतीलाल पाटील, नगरसेवक ललित येवले, गुलाब मराठे , विलास महाजन , किशोर पवार , हेमंत माळी , राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव पाटील, व्ही. टी. माळी, संतोष महाजन , वाल्मिक पाटील, किशोर पाटील , जितेंद्र धनगर , ललित पाटील , जयेश महाजन , गुलाब महाजन , राहुल मराठे , अतुल तायडे , गौरव चव्हाण , रामचंद्र महाजन जगदीश जगताप , नितेश माळी ,भुषण महाजन , नितीन महाजन , शिवा महाजन उपस्थित होत होते.

Exit mobile version