Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तालुक्यातील बोगस डॉक्टारांवर कारवाई करा; वैद्यकीय व्यावसायिकांची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल तालुक्यातील कोरपावली गावात बोगस डॉक्टराच्या उपचारामुळे एका आदिवासी महीलेच्या झालेल्या दुदैवी मृत्युच्या पाश्वभुमीवर यावल तालुक्यातील वैद्यकीय व्यवसायीकांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यावल यांना कारवाई करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, यावल तालुक्यातील अनेक ठिकाणी अनेक गावात बोगस डॉक्टर मुन्नाभाईनी आपली दुकाने उघडली आहेत. त्याचा चुकीच्या उपचारामुळे रूग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून प्रसंगी काही लोकांना आपल्या जिवाशी मुकावे लागत आहे.  अशा बोगस डॉक्टरांवर आरोग्य प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी व कोरपावली येथे बोगस डॉक्टराच्या चुकीच्या उपचारामुळे दुदैवीरित्या मरण पावलेल्या त्या आदिवासी महिलेच्या प्रकरणात आरोग्य प्रशासनाच्या वतीने अद्यापपर्यंत कुठलीही कारवाही झालेली दिसून येत नससल्याचे वैद्यकीय व्यवसायीकांचे म्हणणे आहे .

आदिवासी महिलेस न्याय मिळावा अशा मागणी निवेदन यावल तालुका वैद्यकीय व्यवसायीकांच्या वतीने यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड (बोरसे) यांच्याकडे केली आहे. यावेळी बोगस डॉक्टरांवर त्वरीत कारवाई व्हावी, यासाठीचे निवेदन देतांना डॉ.कुंदन फेगडे, डॉ. धिरज पाटील, डॉ. धिरज चौधरी, डॉ. अमित तडवी, डॉ.दिपक चौधरी, डॉ.ईसरार खान, डॉ. रमेश पाचपोळे, डॉ.अभय रावते, डॉ. सतिष अस्वार, डॉ. पद्दमानभन देशपांडे, डॉ. बि.के.बारी, डॉ. सरफराज तडवी, डॉ. गौरव धांडे, डॉ. दाऊद खान, डॉ. तुषार सोनवणे, डॉ. अमोल महाजन, डॉ. युवराज चोपडे, डॉ. मनोहर महाजन, डॉ. हरीष महाजन, डॉ. चंद्रकांत चौधरी यांच्यासह आदी डॉक्टरांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

Exit mobile version