Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टाकरखेडा जि.प. शाळेच्या मुख्याध्यापकांचा अभिनव उपक्रम

पहूर ता. जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील टाकरखेडा जिल्हा परिषद शाळेचे आदर्श शिक्षक व मुख्याध्यापक प्रभाकर पाटील यांनी स्वखर्चाने शालेय पत्रके छापून पालकांना जिल्हा परिषद शाळांमध्ये आपल्या पाल्यांचे नाव नोंदवण्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

पत्रकात पाटील यांनी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याचे फायदे, शाळेची वैशिष्ट्ये तसेच शाळेतील महत्वपूर्ण बाबी आहेत. जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व पटवून सांगितलेले आहे. पी. टी. पाटील हे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे मुख्याध्यापक आहेत. “विद्यार्थी हेच माझे दैवत” हे पी.टी.पाटलांचे ब्रीदवाक्य आहे. शाळेतील सर्व शिक्षकांच्या मदतीने  व शालेय व्यवस्थापन समितीच्या नियंत्रणाखाली तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनुसार शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्नशील असतात. पाटील यांनी पत्रके शालेय व्यवस्थापन समितीच्या मिटींगमध्ये तसेच गावात जावून पालकांना वाटप केले आहे.

पत्रातील आशय पुढीलप्रमाणे :-

जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याचे फायदे :-(१)मोफत पाठय़पुस्तके (२)उपस्थिती भत्ता वाटप (३)सावित्रीबाई दत्तक पालक योजना (४)दर्जेदार शालेय पोषण पुरक आहार (५)आर्थिकदृष्टय़ा दुर्बल व अनु. जाती तसेच अनु. जमातीच्या मुलांना व सर्व मुलींना मोफत गणवेश (६)विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती सर्व प्रस्ताव शाळेमार्फत तयार करून लाभार्थी विद्यार्थ्याला मिळवून दिले जातात (७)दिव्यांग विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन व साहित्य मोफत वाटप.

शाळेची वैशिष्ट्ये :- (१) ई – लर्निगचा वापर (२)”अ” श्रेणीतील शाळा (३)डिजीटल वर्ग (४)ज्ञानरचनावादी पध्दत (५)स्वच्छ व सुंदर निसर्गरम्य वातावरण (६)अनुभवी शिक्षकवृंद (७)नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारी शाळा (८)शाळा प्रवेशासाठी कोणत्याही प्रवेश चाचणीस  सामोरे जावे लागत नाही (९)विविध स्पर्धांचे  आणी उपक्रमांचे आयोजन.

शाळेतील महत्वपूर्ण बाबी:- (१) वेळेचे महत्व (२)आदर्श व सप्तरंगी परीपाठ, परिपाठातून मूल्यशिक्षण, नैतिक मूल्यांची जोपासना (३)विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष (४)स्वंयशिस्तीचे  व स्वच्छतेचे धडे आणी नेतृत्वगुण विकास (५)नियोजनबद्ध बालमेळावा (६)वार्षिक स्नेहसंमेलन (७)शैक्षणिक सहल (८)पर्यावरण भेटी.

पत्रके वाटपाच्या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना सुरळकर, उपाध्यक्ष रूपाली आगळे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी प्रकाश पाटील, शिक्षणतज्ञ तथा पोलीस पाटील समाधान पाटील  सदस्य शिवाजी डोंगरे, सुधाकर गोसावी  विलास साळुंके आदी उपस्थित होते. पत्रक वाचून पालक शाळे विषयी तसेच मुख्याध्यापकांसह शाळेतील सर्व शिक्षकांविषयी समाधान व्यक्त केले. पहिल्यांदाच असे शाळे प्रवेशा बाबतचे पत्रक वाटप होत असल्याचे काही पालकांनी सांगितले.

 

Exit mobile version