Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तलवार घेवून फिरणारा तरूण अटकेत

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील खेडी गावातील माऊली नगरात हातात तलवार घेवून गावात दहशत माजवित असलेल्या तरूणाला एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “जळगाव तालुक्यातील खेडी येथील पाटीलवाडा येथे राहणारा निलेश रावसाहेब पाटील तरूण हातात तलवार घेवून दहशत माजवित असल्याची गोपनिय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली.

त्यानुसार पोलीस कर्मचारी यांनी सोमवारी, ११ जुलै रोजी सकाळी १० वाजता कारवाई करत संशयित आरोपी निलेश रावसाहेब पाटील (वय-२०) रा. खेडी ता.जि.जळगाव याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून तलवार हस्तगत करण्यात आली आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायंकाळी संशयित आरोपी निलेश रावसाहेब पाटील याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई –

पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. किशोर पाटील, सुधीर साळवे, मुदस्सर काझी, पो.कॉ. छगन तायडे यांनी कारवाई केली.

Exit mobile version