Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेरात एकावर तलवार हल्ला; पोलीसात गुन्हा दाखल

रावेर प्रतिनिधी । महिलेला अश्लिल शब्द बोलण्याच्या कारणावरून एकाला शिविगाळ करून तलवारीने वार करून जखमी केल्याची घटना रात्री घडली. याप्रकरणी रावेर पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, राजू देवराम चौधरी (वय-५५) रा. संभाजी नगर रावेर याने पुष्पाबाई संतोष मराठे यांनी अश्लिल शब्द बोलण्याच्या कारणावरून पुष्पाबाई यांचा मुलगा रविंद्र संतोष मराठे रा. संभाजी नगर याने रागाच्या भरात तलवारीने राजू चौधरीवर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास घडली. जखमी खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. जखमी राजू चौधरीचा भाऊ गणेश चौधरीच्या फिर्यादीवरून रावेर पोलीसात संशयित आरोपी संतोष मराठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि शितल कुमार नाईक करीत आहे.

Exit mobile version