Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ कारणावरून शिवीगाळ; दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । शिवाजी नगर हुडको भागात लहान मुलीकडून पाणी पडल्याच्या कारणावरून विवाहितेस शिवीगाळ करून जीठे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. विवाहितेच्या फिर्यादीवरून दोन जणांविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, शहरातील शिवाजी नगर हुडको भागात रविना सोनवणे ह्या विवाहिता पती रमेश सोनवणे आणि मुलगी परी सोनवणे सह राहतात. पती खासगी नोकरीला आहे. सोमवारी ७ जून रोजी रात्री ११ वाजता परी सोनवणे ही लहान मुलगी पाण्यासोबत खेळत होती. त्यावेळी पाण्याचे काही थेंब शेजारी राहणारे फरिदा व मुनसुख (पुर्ण नाव माहीत नाही) यांच्या अंगावर पाण्याचे थेंब पडले. याचा राग आल्याने मुलीची आई सविना सोनवणे आणि आजी सालनी सालनी सोनवणे यांना फरिदा आणि मनसुख यांनी शिवीगाळ करून ‘तुम्ही इथे कसे राहतात आम्ही तुम्हाला मारून टाकू’ धमकी दिली. विवाहितेच्या फिर्यादीवरून दोन जणांवर जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरूण सोनार करीत आहे.

Exit mobile version