Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उपोषणाच्या दरम्यान स्वाती मालिवालांची प्रकृती बिघडली

नवी दिल्ली वृत्तसंस्था । महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदा हवा या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या दिल्ली महिला आयोगाचा अध्यक्षा स्वाती मालीवाल यांची आज सकाळी प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बलात्कार करणार्‍याला तातडीने फासावर लटकवण्याची तरतूद असणारा कायदा अंमलात आणावा या मागणीसाठी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल हा आमरण उपोषणाला बसल्या आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तेरावा दिवस असून सकाळीच त्यांची प्रकृती खालावली. यामुळे त्यांना लोकनायक जयप्रकाश नारायण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची तब्येत आता स्थिर असल्याची माहिती रूग्णालयातर्फे देण्यात आली आहे. मालीवाल यांनी कालच आंध्रप्रमाणे दिशा कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात यावा ही मागणी पंतप्रधान मोदी यांना पत्राद्वारे केली होती.

Exit mobile version