Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकनाथराव खडसे यांना प्रतिमा भेट

जळगाव प्रतिनिधी– माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना युवक महानगराध्यक्ष स्वनिल नेमाडे व कार्यालयीन सचिव संजय चव्हाण यांनी आज मुंबई येथील कार्यक्रमाची प्रतिमा भेट दिली.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मुंबई येथे प्रवेश घेतला त्यावेळी मुंबई येथील स्टेजवर शरद पवार साहेबांशी नाथाभाऊ चर्चा करतानाचा फोटो व सर्व नेते मंडळी प्रवेश स्थळी हजर असलेल्या कार्यकर्त्याना विजया दशमीच्या शुभेच्छा देताना नेते मंडळीचा स्टेजवरील फोटोची प्रतिमा आज खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी देण्यात आली. खडसे यांना विजया दशमी च्या देण्यासाठी गेले त्यावेळी भेटवस्तू देताना महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, कार्यालयीन सचिव संजय चव्हाण, युवक महा नगराध्यक्ष स्वनिल नेमाडे व किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील याप्रसंगी उपस्थित होते.

Exit mobile version