Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात हरवलेला पुतण्या काकाच्या स्वाधिन; बाजारपेठ पोलीसांची कामगिरी

भुसावळ प्रतिनिधी । कामाच्या निमित्ताने भुसावळात काकासोबत आलेल्या पुतण्या गर्दीत हरवला होता. मात्र भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी काकाचा शोध घेत पुतण्याला स्वाधिन केले असून पोलीसांच्या या कामगिरीमुळे सर्वत्र कौतूक होत आहे. 

१५ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास बसस्थानकात १० वर्षाचा मुलगा एकटा बसून खूप रडत होता. याबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी दखल घेत मुलाला पोलीस ठाण्यात आले. त्याची विचारपुस केली असता त्याला काहीही सांगता येत नव्हते. पोलीस निरीक्षक भागवत यांना सुत्रे हालविण्यास सुरूवात केली. अखेर रोहन विकास सुरवाडे (वय-१०) रा. भिम नगर, मलकापूर जि. बुलढाणा असे मुलाचे नाव असून त्याचे काका  विजय गणपत सुरवाडे (वय-४२) यांच्याशी संपर्क साधुन भुसावळात बोलावून घेतले. खात्री पटल्यानंतर मुलाला काकाच्या स्वाधिन करण्यात आले. 

यांनी केल कामगिरी

पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ तस्लीम पठाण, कृष्णा देशमुख, पोहेकॉ मिलींद कंक, वाल्मीक सोनवणे, पोना संदिप परदेशी, सुभान तडवी, रमन सुळकर, पोकॉ किशोर मोरे, सचिन चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Exit mobile version