Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडसे महाविद्यालयात स्वच्छ भारत मिशन व वृक्षारोपण

मुक्ताईनगर प्रतिनिधी । श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन व वृक्षारोपण करण्यात आले.

एनएसएसच्या स्वयंसेवकांनी सामाजिक बांधिलकीचे भान जपत आणि स्वच्छ भारत मिशन हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून परिसर स्वच्छ आणि पारदर्शक केला.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एच. ए.महाजन यांनी ‘स्वच्छता हीच समाजसेवा’ असून प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेतली गेली पाहिजे. संत गाडगेबाबा यांच्या विचाराची आणि कृतीची आज देशाला गरज आहे आणि म्हणून नवयुवकांनी संत गाडगेबाबांच्या विचाराला आणि कृतीला गवसणी घातली पाहिजे, अशी आशा व्यक्त केली. या निमित्ताने महाविद्यालयाच्या परिसरात प्राचार्य महाजन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ. अनिल पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.संजीव साळवे, प्रा. डॉ. प्रतिभा ढाके एनएसएस अधिकारी, स्वच्छ भारत मिशन आणि वृक्षलागवडीचे समन्वयक प्रा. डॉ.दिपक बावस्कर, एनएसएस महिला अधिकारी प्रा. डॉ. छाया ठिंगळे आणि महाविद्यालयाचे एनएसएस प्रमुख प्रा. विजय डांगे यांनी केले.

तसेच ज्ञानेश्वर शेळके, राहुल शेळके, नूरखान मुलतानी, कुणाल भारंबे, ऋत्विक बडे, निकिता पाटील, चैताली पाखरे, गायत्री दुट्टे, भाग्यश्री जयकर, मीनाक्षी घुले, तेजस सरोदे, चेतन मोरे, शारदा तळेले, काजल सपकाळे, काजल काचकुटे, ललिता इंगळे, पल्लवी महाजन, श्वेता धायडे, योगेश्वरी कांडेलकर, निकिता देशमुख, शितल भोई, वैष्णवी सावळे, शुभांगी दुट्टे, सारिका भोसले, सायली राणे, श्रद्धा गिरी, किरण माळी, अनिल वसावे, नेहा राणे, चिन्मय महाजन, प्रफुल यमनेरे, कमलेश जावरे, दीपक पंडित, देवेंद्र धांडे, सिद्धांत पाटील, उदय कोळी आणि निखिल रायपुरे इत्यादी स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने स्वच्छ भारत मिशन आणि वृक्षलागवड – वृक्षसंधारण  कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.

 

Exit mobile version