Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्यात स्वच्छ भारत अभियान ; ३ टन कचरा गोळा

यावल प्रतिनिधी । नेहरू युवा केंद्र जळगाव, जिल्हा प्रशासन व यावल किसान प्रोड्युसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत यावल तालुक्यातील १५ गावांमध्ये आज सकाळी ७ ते १० वाजेच्या दरम्यान स्वच्छ्ता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी तब्बल ३ टन कचरा गोळा करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला यावलचे तहसीलदार महेश पवार , पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विलास भाटकर, यावलचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, नेहरू युवा केंद्र जळगावचे अधिकारी नरेंद्र डागर, अकांटट अजिंक्य गवळी व यावल फार्मर प्रोड्युसर कंपनी अध्यक्ष ज्योत्स्ना पाटील व उपाध्यक्ष मुकुंदा चौधरी तसेच सल्लागार दीपक पाटील सर यांचे विशेष सहकार्य लाभले. स्वच्छ्ता अभियान कार्यक्रम पुढील गावांमध्ये मोठ्या उत्साहात राबविण्यात आला.

कोरपावली येथे मिलिंद महाजन व ग्रामस्थ, यावल शहरात गणेश पाटील व नागरीक बामणोद येथे हेमराज ढाके व ग्रामस्थ, सावखेडा येथे संचालक निलेश पाटील  व ग्रामस्थ, वड्री येथे निवृत्त कृषी पर्यवेक्षक ए टी चौधरी व ग्रामस्थ, दोनगाव येथे विजय पाटील  व ग्रामस्थ, विरावली येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभायती मुन्ना पाटील, भूषण पाटील , हेमंत पाटील,विश्वनाथ पाटील, महेंद्र पाटील, धनराज पाटील, विजयसिंग पाटील, मेहबूब तडवी, दामू अडकमोल, व ग्रामस्थ, आमोदा येथे वासुदेव पाटील, ललित महाजन तसेच आमोदा गावचे ग्रामस्थ, न्हावी येथे मुकुंदा चौधरी , उपसरपंच उमेश बेंडाळे , न्हावी ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी राजेंद्र महाजन व नेहरू युवा केंद्र समन्वयक पल्लवी तायडे, पाडळसा येथे राज चौधरी व ग्रामस्थ, चितोडा येथे रमेश तायडे व महिला वर्ग व ग्रामस्थ, दहिगाव येथे सरपंच अजय अडकमोल, उपसरपंच किशोर महाजन व ग्रामस्थ, पिंपरुड येथे सरपंच कोळी , युपल चौधरी, भाग्येश राणे, सौरभ चौधरी आणि ग्रामस्थ, किनगाव येथे धीरज पाटील, सचिन पाटील व ग्रामस्थ, बोरखेडा ग्रामस्थ सरपंच तळेले , ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रगतिशील शेतकरी अतुल तळेले यांनी कार्यक्रम यशस्वी केला.

संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव यावल तालुक्यात एकाच वेळी इतक्या गावांमध्ये स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम राबविण्यात आला आहे. ३ टन कचरा गोळा करण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे मोठ्या प्रमाणावर स्वच्छ्ता करण्यात आली तसेच स्वच्छते बाबत गावातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. या सर्व कार्यक्रमाचा समारोप यावल तहसील कार्यालयात करण्यात आला. यावेळी नायब तहसिलदार आर डी पाटील, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते रणजित सिंग राजपूत, नेहरू युवा केंद्र समन्वयक तेजस पाटील व पल्लवी तायडे, यावल फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष ज्योत्स्ना पाटील , सल्लागार दीपक पाटील, उपाध्यक्ष मुकुंदा चौधरी , संचालक योगेश चौधरी, संचालक कुणाल कोल्हे, संचालक प्रतीक वारके, संचालक निलेश पाटील, संचालक गोकुळ पाटील, प्रमोटर दिग्विजय पाटील, प्रमोटर महेश पाटील, भूषण पाटील, दिगंबर चौधरी आदी उपस्थित होते. राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते रणजित सिंग राजपूत व दीपक पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले. नेहरू युवा केंद्र समन्वयक तेजस पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

 

 

 

Exit mobile version