साप्ताहिकात बदनामीकारक लिखाणाच्या निषेधार्थ सुवर्णकार सेनेचे निषेध आंदोलन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । मालेगाव मित्र या साप्ताहिकातील बदनामीकारक लिखाणाचा निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्ह्याच्या वतीने आंदोलन करत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना देण्यात आले आहे

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३ सप्टेंबर रोजी मालेगाव मित्र या साप्ताहिक पेपरचे संपादक रामदास पगारे, यांनी उपसंपादक राजाराम पाटील या दोघांनी सुवर्णकार समाजाच्या बदनामीकारक मजकूर लिहिला आहे. यामुळे सुवर्णकार समाजाच्या भावनांना ठेच पोहोचून सर्वांच्या आईवरून घाणेरड्या शब्दात उल्लेख केला गेला आहे. या लिखाणामुळे समाजात अनेक पडसाद उमटत आहे. तसेच सुवर्णकार व सराफ व्यवसायिकांच्या व्यवसायाबद्दल अत्यंत चुकीचे शब्दांकन केलेले आहे. यामुळे सुवर्णकार समाजाच्या व्यवसायाबद्दल गैरसमज पसरू शकतो, अशा विक्षिप्त प्रवृत्तीवर त्वरित आळा बसवा, पेपरवर त्वरित कारवाई करून हा पेपर बंद करण्यात यावा, सुवर्णकार समाजाचा व सराफ बांधवांच्या भावनांचा गांभीर्याने विचार करण्यात यावा. दरम्यान या प्रकरणी योग्य कारवाई न झाल्यास महाराष्ट्रातील सुवर्णकार बांधव व सह व्यवसायिक तीव्र आंदोलन घेण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

या निवेदनावर जळगाव शाखेच्या जिल्हाध्यक्ष संजय विसपुते, उपाध्यक्ष विजय वानखेडे, पंकज विसपुते, सुभाष सोनार, प्रशांत विसपुते, इच्छाराम धामणे, नंदू बागुल, विनोद विसपुते, विनोद सोनार, गणेश दापोरेकर, रमेश सोनार, संजय दुसाने, विलास बाविस्कर, विजय बागूल, शशिकांत जाधव, योगेश भामरे, सुरेश सोनार, संजय पगार, दीपक जाधव, रोहन सोनार, विजय वानखेडे, बापू सोनार, उमेश विसपुते, बबलू बाविस्कर, पंकज रणधीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content