Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विधानपरिषदेसाठी कॉंग्रेसच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स

नागपूर प्रतिनिधी | येथील विधानपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स निर्माण झाला असून पक्ष आपल्या अधिकृत उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठींबा देण्याच्या तयारीत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

नागपूर विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात कॉंग्रेसने भाजपामधून आलेले रवींद्र भोयर यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, आता कॉंग्रेसने पक्षाचे अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांना बाजूला करून अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिल्याची चर्चा आहे.

नागपूर विधान परिषदेमध्ये निवडणुकी मध्ये कॉंग्रेसने आपल्या अधिकृत अधिकृत उमेदवार रवींद्र भोयर यांना बाजूला करत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन दिल्याचा पत्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीला मिळाले आहे. काल प्रदेश कॉंग्रेस कमिटीने अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना समर्थन देण्याच्या मागणीचा पत्र केंद्रीय कमिटीकडे पाठवले होते. आज प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या या प्रस्तावाला केंद्रीय कमिटीने मंजुरी दिली, अशी चर्चा आहे. मात्र अद्यापही याबाबत अधिकृतपणे कुणीही बोलेले नाही.

दरम्यान, याबाबत रविभवन येथे कॉंग्रेसची बैठक झाली या बैठकीत पालकमंत्री नितीन राऊत क्रीडा मंत्री सुनील केदार व जिल्ह्यातील इतर नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना कॉंग्रेस नेते सुनील केदार म्हणाले की, मी याबाबत प्रथमच प्रसारमाध्यमांमधून ऐकत आहे. आतापर्यंत अशी कुठलीही गोष्ट माझ्या कानावर आलेली नाही. मला याची अजिबात कल्पना नाही.

Exit mobile version