Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना २ दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी १५ जानेवारी रोजी सकाळी पोलीस मुख्यालयात येवून पोलीसांच्या समोर हजर झाल्याने त्यांना अटक करण्यात आली. आज दुपारी जळगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक पदावर असतांना किरणकुमार बकाले यांनी संभाषणात मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. याबाबत ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झाली होती. यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड उद्रेक झाला होता. यावेळी समाज बांधवांनी जिल्हा पेालीस अधिक्षक कार्यालयात आक्रमक पवित्रा घेतला होता.

त्यावेळी तत्कालिन पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी मराठा समाज बांधवांना पुढील कारवाई करण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बकालेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. किरणकुमार बकाले यांना अटक करावी अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आले होत. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वेळोवेळी निवेदने देण्यात आली तर विधानसभेत देखील बकालेचा प्रश्न मांडण्यात आला होता.

त्यानुसार बकालेला अटक करण्यासंदर्भात पोलीसांना सुचना देण्यात आले होत. दरम्यान या कालावधीत किरणकुमार बकाले हे फरार झाले होते. या प्रकरणाला आता साधारण दीड वर्ष पुर्ण होत आहे. बकाले यांनी स्थानिक न्यायालया आणि औरंगाबाद खंडपीठात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला. मात्र न्यायालयातून त्यांचा अर्ज फेटाळून लावला होता. दुसरीकडे पोलीसांनी त्यांची मालमत्ता जप्त करण्याच्या मागणीसाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता.

त्यामुळे चोही बाजूने आपल्या अडचणी वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर बकाले हे सोमवारी १५ जानेवारी रोजी सकाळी जिल्हा पोलीस अधिक्ष कार्यालयात येवून हजर होवून सरेंडर झाले. सोमवारी १५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Exit mobile version