Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रशांत बच्छावांची चौकशी करून निलंबित करा- साबळे

जळगाव प्रतिनिधी । अपहार प्रकरणांच्या चौकशी समितीचा अहवाल खोटा ठरवूून सुरेश जैन यांना क्लीन चीट देणारे अपर अधिक्षक प्रशांत बच्छाव यांची चौकशी करून त्यांना निलंबीत करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते उल्हास साबळे यांनी केली आहे.

वाघूरसह अन्य अपहार योजनांची चौकशी एसआयटीच्या माध्यमातून करण्याचे निर्देश नुकतेच उच्च न्यायालयाने दिले आहेत. तर यावर स्थगिती देण्याची मागणी करणार्‍या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावल्यात आहेत. या पार्श्‍वभूमिवर, सामाजिक कार्यकर्ते उल्हास साबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात संबंधीतांना क्लिन चीट देणारे अपर अधिक्षक प्रशांत बच्छाव यांच्यावर गंभीर आरोप दिले. बच्छाव यांची चौकशी करून त्यांना निलंबीत करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. नगरपालिका, वाघूर, विमानतळ, जिल्हा बँकेतून बेकायदेशीर कर्जवाटप या प्रकरणांमध्ये राज्य शासनाने नेमलेल्या न्यायमूर्ती पी. बी. सावंत, सुधाकर जोशी व सुनील सोनी यांच्या अहवालात तत्कालीन आमदार सुरेश जैन यांच्यासह अनेक नगरसेवकांवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवला होता. दरम्यान, या आयोगाचा अहवाल खोटा ठरवून अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी सुरेश जैन यांच्यासह अनेकांना क्लीन चिट देणारे दोषारोप न्यायालयात सादर केले आहे. या प्रकरणात बच्छाव यांची लाचलुचपत विभागातर्फे चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी केले असून याचे पत्र त्यांनी मुख्यमंत्री व पोलिस महासंचालकांकडे पाठवले आहे.

Exit mobile version