कासवा ग्रुप ग्रामपंचायत ग्रामसेवकाला निलंबीत करा : रिपाईची मागणी

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । कासवा ग्रुपच्या ग्रामपंचायत ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांनी यावल येथील गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

या संदर्भात रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट ) यांनी दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की , कासवा तालुका यावल ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे गावाचे सरपंच राहुल विश्वनाथ इंगळे हे दलीत समाजाचे असल्याने सरपंच यांच्याशी जाणीवपुर्वक व्देश भावनेची वागणुक देत असल्याने या गोंधळामुळे गावाचे विकासकामे ही खंडीत झाली आहे. ग्रामसेवक हे ग्रामपंचायतचे सरपंच व प्रशासनाला विश्वासात न घेता सतत तिन मासिक सभेस गैरहजर राहील्याने सभेस घेण्यात आलेले ठराव प्रोसीडींगवर घेण्यात येत नसल्याने या सभा रद्द झाल्याने शासनाने गावाच्या विकासा कामांसाठी दिलेल्या निधीचा वापर करता येत नाही.

कासवा गावातील ग्रुप ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्या अशा प्रकारच्या गोंधळलेल्या जातीयव्देष भावनेच्या वागणुकीची लिखित तक्रार करून अशा प्रकारची बेजबाबदार पणाची वागणुक देणाऱ्या ग्रामसेवका विरूद्ध निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी श्रीमती मंजुश्नी गायकवाड यांच्याकडे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवंशी , कासवा ग्रामपंचायतचे सरपंच राहुल इंगळे, सुनिल तायडे, सचिन भालेराव, हर्षल भालेराव, शुभम पाटील, विश्वास भालेराव आदींनी केली आहे

 

Protected Content