Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोबाईल जबरी चोरीतील संशयितांना अटक; एलसीबीच्या तीन पथकांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने त्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हेला आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन वेगवेगळ्या पथकाने जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून  मोबाईल जबरी चोरी करणाऱ्या संशयितांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

एरंडोल तालुक्यातील रवंजा येथून विठ्ठल साहेबराव देशमुख याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे त्याच्याकडून जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला असून या गुनातील सहा हजार रुपयांचा मोबाईल अष्टकत करण्यात आला आहे त्याला पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल आहे.

मालेगाव येथून पथकाने इरफान उर्फ डोकोमो नाझीम अन्सारी , आरिफ इकबाल शाह या दोघांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्यांच्याकडून चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा उघडकीस आला आहे. गुन्ह्यातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी दोघांना मेहूनबारे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

तर तिसऱ्या एका पथकाने जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील एजाज खान मजीद खान व फारूक रशीद शेख रा. नागदुली ता. एरंडोल या दोघांना अटक केली या दोघांकडून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आला असून या गुन्ह्यात १८  हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल पोलिसांनी दोघा संशयिताकडून हस्तगत केले आहेत. दोघांना पुढील कारवाईसाठी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Exit mobile version