Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात संशयित चोरट्याला अटक

12

 

भुसावळ, प्रतिनिधी | शहरात बुधवारच्या मध्यरात्री १२.१५ वाजता चोरीचा उद्देशाने दबा धरून असलेल्या इसमास पेट्रोलिंगवर असणाऱ्या पोलीस पथकाने अटक केली आहे. त्याच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भुसावळ वरणगाव रोडवरील सुहास हॉटेलच्या पाठीमागील भिंतीचा आडोशाला अंधारात एक इसम काहीतरी करीत असल्याचे पेट्रोलिंगवरील पोलिसांना आढळून आला. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. पेट्रोलिंग करीत असलेले कर्मचारी पो.ना रविंद्र बि-हाडे पो.कॉ.उमाकांत पाटील ,कृष्णा देशमुख , विकास सातदिवे, ईश्र्वर भालेराव ,प्रशात परदेशी यांनी त्याला आवाज दिला असता त्याने पोलिसांना पाहून पळण्याचा प्रयत्न केला. त्यास पोलीसांनी तत्काळ ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव धीरज कलीटर पवार (वय १९, रा. घोरठाणे गाव बल्लापूर ता. जि. अमरावती) असे सांगितले. धीरज पवार याची पोलिसांनी अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सुर्यास्तानंतर ते सुर्योदयापुर्वी रात्री अंधाराचा फायदा घेवुन चोरी घरफोडी करण्याचे उदेशाने ६ चाबीचा गुच्छा आढळून आला. त्याच्या विरोधात भुसावळ बाजार पेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. ना. रवींद्र बिऱ्हाडे करीत आहेत.

Exit mobile version