Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गावठी पिस्तूलासह संशयिताला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरात अवैधपणे गावठी पिस्तूल घेवून दहशत माजविणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून २५ हजार रूपये किंमतीची गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे.

अर्जुन भास्कर पाटील (वय-२५) रा. नागसेन कॉलनी, कंडारी, ता. भुसावळ, जि.जळगाव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरात अर्जुन भास्कर पाटील (वय-२५) रा. नागसेन कॉलनी, कंडारी, ता. भुसावळ, जि.जळगाव हा गावठी बनावटीची पिस्तूल घेऊन परिसरात दहशत माजवीत असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसननजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकातील सहाय्यक फौजदार अनिल जाधव, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, संतोष मायकल, भारत पाटील या पथकाने गुरुवार २० ऑक्टोबर रोजी दुपारी कारवाई करत संशयित आरोपी अर्जुन पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळील २५ हजार रुपये किंमतीची गावठी बनावटीची पिस्तूल हस्तगत केली आहे. पुढील कारवाईसाठी त्याला भुसावळ शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Exit mobile version