Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

काठीने मारून प्रौढाच्या मृत्यूप्रकरणी अटकेतील संशयिताला पोलीस कोठडी

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  फॅक्टरीच्या आवारात मजाक मस्करीतून झालेल्या वादात एकाने डोक्यात काठी मारताचा घाव वर्मीत लागताच ५८ वर्षीय प्रौढाचा जागेवरच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना रविवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली होती.

याप्रकरणात दिपक कृष्णकुमार सिंग (वय-५० रा. वरणगाव फॅक्टरी) याला अटक करण्यात आली होती. सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगळवारी १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील सिध्देश्वर नगरात  प्रमोद ज्ञानेश्वर महाजन (वय-५५ ) हे प्रौढ व्यक्ती आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरीला होते.  रविवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास वरणगाव फॅक्टरी आवारातील सुशील नगर सर्कल जवळ त्याचा मित्र दिपक कृष्णकुमार सिंग (वय-५० रा. वरणगाव फॅक्टरी) याच्या सोबत वडापाव खात बसले होते. या दोघांमध्ये गप्पा मारत असतांना मजाक मस्करीला सुरूवात झाली त्यानंतर दिपकसिंगने जवळ असलेली काठी प्रमोद महाजन यांच्या कपाळावर मारली.

यात काठीचा जोराचा फटका डोक्यावर मारताच घाव वर्मीत लागला आणि त्यातच त्यांची जागेवर मृत्यू झाला होता. याप्रकरणात पोलीसांनी संशयित आरोपी  दिपक कृष्णकुमार सिंग याला अटक करण्यात आली होती. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी  दुपारी १ वाजता न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने  मंगळवारी १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.    पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ करीत आहे.

Exit mobile version