Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात फसवणूक करणाऱ्या संशयित आरोपीला अटक

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील एका ईलेक्ट्रॉनिक दुकानदाराकडून एसी व फ्रिज घेवून ५३ हजार रूपयांची फसवणूक करणाऱ्या गुन्हेगाराला भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी खडका चौफुलीवरून अटक केली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, जगदीशसिंग छाबडा रा. तेली मंगल कार्यालय यांचे घराजवळ गुरूनानक इलेक्ट्रॉनीकचे दुकान आहे. या दुकानावरून संशयित आरोपी शेख चांद हमीद (वय-३५) रा. दिनदयाल नगर याने २६ जून रोजी ५३ हजार रूपये किंमतीचे फ्रीज आणि एसी या वस्तू घेतल्या परंतू त्यांनी पैसे न देता फसवणूक केली. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीखक दिलीप भागवत यांच्या पथकाने संशयित आरोपी शेख चांद याला खडका चौफुलीवरून अटक केली आहे. 

यांनी केली कारवाई

उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीखक दिलीप भागवत यांच्या सुचनेनुसार  सपोनि कृष्णा भोये, पो.ना.रविंद्र बिऱ्हाडे, रमन सुरळकर, उमाकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, योगेश माळी, परेश बिऱ्हाडे जिवन कापडे आदींनी कारवाई केली. याप्रकरणी भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास सहा पो निरीक्षक कृष्णा भोये सर व रविद्र तायडे करीत आहेत.

 

Exit mobile version