Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला अटक

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील साकरी फाट्याजवळील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून चोरीचा प्रयत्न उघडकीला आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, नारायण गंगाभिषण पुरणकार (वय-४७) रा. लोणारी हॉलजवळ, हुडको कॉलनी भुसावळ हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रिक्षा चालवून आपला कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. २० मे रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी संयज साहेबराव गोराडक रा. गडकरी नगर , भुसावळ हा घरातचा दरवाजा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करत असतांना स्थानिक नागरीकांनी अटक केली आहे. पुढील कारवाई साठी भुसावळ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी संजय गोराडकर यांनी याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय नेरकर करीत आहे.

 

 

 

Exit mobile version