सर्पदंश झालेल्या मुलाचे वाचले प्राण; डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी उपचार

जळगाव प्रतिनिधी । यावल येथे राहणारा बारेला कुटुंबातील एका १५ वर्षीय बालकास रात्री घरात झोपलेला असताना साप चावला असून त्याच क्षणाला त्याला ताबडतोब डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले. या बालकाचे प्राण वाचविण्यात डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील तज्ञांना यश आले आहे.

साप म्हटला की भले भल्यांची भंबेरी उडते मग १५ वर्षाच्या बालकाचे काय? साप चावल्याने अत्यावस्थ झालेल्या या बालकावर डॉ उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी उपचार करण्यात येउन जीव वाचवण्यास यश आले. याबाबत माहिती अशी की मुळ ब—हाणपूर व आत्‍ता यावल येथे राहणारे बारेला कुटुंब रात्री घरात झोपले होते. १५ वर्षीय निंबा बारेला देखिल यात झोपला असतांना पहाटे ४ वा अचानक ओरडला साप,सापने काटा आणि बेशुध्द पडला. त्याला ताबडतोब डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात आणले असता प्रथमोचार विभागात डयुटीवर असलेल्या डॉ तेजस कोटेचा यांनी परिस्थीतीचे भान ठेवत धनुर्वात आणि अन्टी स्नेक व्हेनम इंजेक्शन दिले. रूग्णांच्या डोळयाजवळ सापाने चावा घेतला होता. त्यामूळे डोळे देखिल उघडत नव्हता. याचबरोबर श्‍वास घ्यायला देखिल त्रास होत असल्याने त्यास ताबडतोब मेडीसिन अतिदक्षता विभागात पाठवण्यात आले. यावेळी डयुटीवर हजर असलेल्या डॉ जूनेद कामेली यांनी परिस्थीती आटोक्यात आणण्यासाठी ताबडतोब रूग्णास इन्क्युबेट करत व्हेल्टीलेटर्स लावले. यानंतरचे जवळपास ३६ ते ४८ तास महत्वाचे होते. याचदरम्यान प्रमुख डॉ. चंद्रया कांते, डॉ पूजा तन्नीवार यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ तेजस कोटेचा, डॉ जूनेद कामेली, डॉ. समाधान बाहेकर, डॉ. प्रियंका भालके, या टीमने दर अर्ध्यातासात अ‍ॅट्रोपिन न्युओस्टीग्मीन ही इंजेक्शन देत असतांना रक्‍तदाब, ठोके नियंत्रित ठेवण्यात यश मिळवले.या डॉक्टरांच्या टीमला डॉ वेणूगोपाल चिग्मम, डॉ हर्षदा चिंदे, डॉ प्राजक्‍ता चिंचोले, डॉ ॠतूराज शिर्के, डॉ.आयुष सावळकर तसेच नर्सिग स्टाफ टोबीन ब्रदर, राहूल विचवे, हर्षल पाटील, आकाश धनगर धनगर यांनी सहकार्य केले. इग्रजीत एक म्हण आहे. अ डींळलह ळप ींळाश ीर्शींशी छळपश तातडीच्या उपचाराने १५ वर्षीय बालकांचा पुर्नजन्मच झाला असे म्हणावे लागेल. भिती व अज्ञानामूळे रूग्ण धोक्यात जातात — डॉ.कांते सर्वच साप विषारी नसतात पण साप चावल्याची भिती मनात असते आणि म्हणूनच माणूस बेशुध्द पडतो अथवा मृत्यूमुखी पडतो. ब—याच केसेस मध्ये वेळ कमी असल्याने परिस्थीतीचे भान ठेवणे गरजेचे असते त्याच बरोबर रूग्णालयात अत्याधुनिक सुविधा देखिल एकाच छताखाली उपलब्ध असल्यास लवकर उपचार करणे शक्य होते.निंबा बारेला या बालकांचे प्राण वाचल्याचे समाधान आहे.

 

Protected Content