सुरेश पांडे यांनी कामाद्वारे युवा पिढीसमोर ठेवला एक वेगळा आदर्श

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मूळचे एरंडोल तालुक्यातील रवंजाचे रहिवासी असलेले आणि म्हसावद पोस्ट ऑफिसला पोस्टमन म्हणून कार्यरत असलेल्या सुरेश रामचंद्र पांडे यांनी आपल्या कामाद्वारे युवा पिढीसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

पोस्टमन म्हणून कार्यरत असलेले सुरेश रामचंद्र पांडे यांनी आपल्या सर्विसमध्ये त्यांनी आजपर्यंत कामादरम्यान एकदेखील सुट्टी वा रजा न घेतली नाहीये. ‘सर्वांचे टपाल लवकरात लवकर पोहोचावेत’ या उद्देश्यातून ते सतत कार्यरत राहिले.

सन २०१० ते २०१३ सालापर्यंत त्यांनी गावात पायी चालत टपाल वाटप केली. त्यांनतर २०१५ ते २०१८ पर्यंत टपाल वाटण्यासाठी त्यांच्या पायांना सायकलच्या चाकाची गती मिळाली.

सुरुवातीला म्हसावद आणि नंतर नागदुली या दोघी गावांसाठी चांगल्या पद्धतीने कामगिरी करत सेवा दिली. ‘सरकारी काम आणि उद्या सांग’ या समाजात प्रचलित रूढी प्रमाणे कामात कुचराई न करता, कामादरम्यान एकदेखील सुट्टी वा रजा न घेता पोस्ट ऑफिस पोस्टमनचे काम प्रामाणिकपणे केल्याबद्दल त्यांना स्थानिक ग्रामस्थांनी आदराचं स्थान दिलं असून वेळेवर टपाल मिळाल्याने आभार व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content