Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुरेश चौधरी यांचा स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा

a199ae76 8a37 48c1 a724 10fdaddbd19d

धरणगाव (प्रतिनिधी) लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून आपला मुलगा निवडून आला आहे. त्यामुळे एकाच घरात दोन पद नको, म्हणत  पालिकेतील शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक सुरेश नाना चौधरी यांनी जिल्हाधिकारींकडे आज राजीनामा दिला आहे.

 

सुरेश नाना चौधरी यांचे चिरंजीव निलेश चौधरी हे नुकतेच लोकनियुक्त नगराध्यक्षपदी निवडून आल्यामुळे एकाच घरात दोन पदे नको. नगरसेवक पदासाठी दुसर्‍याला संधी मिळावी, या उद्देशाने सुरेश चौधरी यांनी आज नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील सर ,शहर प्रमुख राजेंद्र महाजन, गटनेते पप्पू भावे, वाल्मिक पाटील, धीरेंद्र पुर्भे व नगरसेवक उपस्थित होते.

Exit mobile version