Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुरभि बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे मंगळागौरी साजरी (व्हिडीओ)

mangalagauri

 

जळगाव प्रतिनिधी । सुरभि बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे दि. 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माहिलांनी मंगळागौरीनिमित्त विविध खेळ खेळण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, सुरभि बहुउद्देशीय महिला ग्रुपतर्फे विविध कार्यक्रम घेतले जातात. डोहळेजेवण व मंगळागौरीचे खेळ गेल्या सात वर्षापासून मंडळात राबविण्यात येत आहेत. तसेच आज देखील मंगळागौरीचे खेळ खेळण्यात आले. तसेच या खेळामार्फत जनजागृती करण्यात येते. याचबरोबर उखाणे व या उपक्रमातून मिळेलेल्या निधीचा वापर सामाजिक कार्यासाठी केला जातो. या मंडळात एकूण 11 माहिला आहेत. हे खेळ खेळण्यासाठी गेल्या एक ते दीड माहिन्यांपासून सराव केला जातो. यामुळे माहिला नवनवीन खेळ खेळण्याची संधी मिळते. तसेच यातून त्यांचा व्यायाम देखील होत असतो. यावेळी अध्यक्षा स्वाती कुलकर्णी, गायिका रोहिणी कुलकर्णी, निवेदिका मंजुषा राव इतर सदस्य मेघा नाईक, शुभांगी पुरणकर, स्मिता मोहरील, अर्चना मुळे, सुनीता सातपुते, स्वाती कुलकर्णी, ममता अग्निहोत्री आदी माहिला यावेळी उपस्थितीत होत्या.

तसेच या मंडळातर्फे पुरग्रस्तांसाठी मदत करण्यात येत असून जास्तीत जास्त संख्येने मदत करावी असे आवाहन अध्यक्षा स्वाती कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आले आहे. डोहाळेजेवण व मंगळागौरीचे खेळ खेळांसाठी संपर्क करु शकतात. स्वाती कुलकर्णी 9420943761, मंजुषा राव 9405448158.

Exit mobile version