Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आंबील ओढा परिसरातील नागरिकांची सुप्रीया सुळे यांनी घेतली भेट

पुणे प्रतिनिधी । येथील आंबील ओढा परिसरातील नागरिकांची आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी भेट घेतली.

पुण्यातील आंबिल ओढा परिसरात राहणार्‍या स्थानिकांच्या घरांवर महापालिकेनं गुरुवारी हातोडा चालवला होता. गुरुवारी पहाटे महापालिकेनं पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. या कारवाई दरम्यान नागरीक आणि स्थानिकांमध्ये संघर्ष होऊन तणाव निर्माण झाला होता. प्रचंड गोंधळानंतरही महापालिकेनं कारवाई सुरूच ठेवली होती. सुरुवातीला कारवाईच्या आदेशाबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. बिल्डरनेच कारवाई केल्याचं नागरिकांचं म्हणणं होतं. मात्र, नंतर महापालिकेनं कारवाईची जबाबदारी घेत स्पष्टीकरण दिलं होतं. दरम्यान, या कारवाईला न्यायालयाने स्थगिती दिली असून, पाडण्यात आलेल्या घरांवरून स्थानिक आक्रमक झाले आहेत.

 

स्थानिकांनी सोमवारी सकाळी पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या देत आंदोलन सुरू केलं. यावेळी मोठ्या संख्येनं लोक जमा झाले होते.

आंबील ओढा येथील घरं पाडण्यात आलेल्या स्थानिकांनी पुणे महानगरपालिकेच्या समोर ठिय्या मांडत आंदोलन सुरू केलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेतली. महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल सुळे यांनी माहिती घेतली. यावेळी आंदोलकांनी कारवाई का करण्यात आली, पुन्हा घरं बांधून देण्याची मागणी केली.

Exit mobile version