Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रेस्टॉरंट खुली करण्याची सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

मुंबई- सहा महिने होऊनही राज्यातील रेस्टॉरंटस् अद्याप खुली झालेली नाहीत. त्यामुळे रेस्टॉरंटचा व्यवसाय अडचणीत सापडला असून त्याबाबत सहानुभूतीपुर्वक विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील रेस्टॉरंटचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सध्या पार्सलची मुभा देण्यात आली असली तरी, यातून या उद्योगाला सावरण्यासाठी ती पुरेशी नाही. याशिवाय अनेक रेस्टॉरंटस् चालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना समोर जावे लागत आहे. या व्यावसायिकांना होणारा त्रास लक्षात घेता, रेस्टॉरंटस् सुरू होणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असणारे सोशल डिस्टन्सिंग आदीचे दिशानिर्देश देखील जारी करावेत. आपणास विनंती आहे की, कृपया या व्यावसायिकांच्या बाबातीत सहानुभूतीपुर्वक विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा”, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्यात हॉटेल, रेस्टॉरंटस् बंद ठेवण्यात आले आहेत. त्याऐवजी पार्सल सुविधा देण्यात आली आहे. परंतु आता सहा महिने उलटले असून रेस्टॉरंटस् खुली करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र रेस्टॉरंटस् क्लबने केली आहे.

Exit mobile version