Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘सुप्रीम कोर्ट आमच्या खिशात !’ ही मानसिकता धोक्याची : राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा |” राज्यात चुकीच्या पध्दतीने सरकार लादल्यानंतर आता ती मंडळी सुप्रीम कोर्ट आमच्या खिशात असल्याच्या मानसिकतेत वागत असून ही धोक्याची बाब आहे !” अशा शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी टिका केली आहे.

आज शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील लढाईचा निर्णायक निकाल हा सुप्रीम कोर्टात लागण्याची शक्यता आहे. याआधी आज पक्षाचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादात शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

ते म्हणाले, दबावतंत्राचा वापर करून ज्या प्रकारे सत्तांतर झाले खरं म्हणते लादण्यात आले ते पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. कोर्ट हे नि:पक्षपाती असल्याने येथे आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. तथापि, अनेक जण सुप्रीम कोर्ट हे आपल्या खिशात असल्याच्या मानसिकतेत वावरत असून ही धोक्याची बाब आहे. आम्हाला कोर्टाकडून खूप मोठ्या अपेक्षा असून यात आमचा विजय होणार असल्याचा दावा त्यांनी केला. यातून त्यांनी कोर्टाने नि:पक्षपाती निकाल देणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Exit mobile version