Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विविध कार्यकारी ग्रामउद्योग सहकारी संस्थेचे चेअरमन सुनील मिस्तरी तर व्हाईस चेअरमन सुधाकर जाधव यांची निवड.

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । भडगाव येथील तालुक्यातील ग्रामीण कारागिरांची विविध कार्यकारी ग्रामउद्योग संस्थेचे चेअरमनपदी सुनील मिस्तरी आणि व्हाईस चेअरमनपदी सुधाकर जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सुनील मिस्तरी यांची सलग दुसऱ्यांदा चेअरमन पदासाठी संधी मिळाली आहे. चेअरमन पदासाठी सुनील मिस्तरी यांचा एकमेव अर्ज आला होता तर व्हॉइस चेअरमन पदासाठी सुधाकर जाधव यांनी अर्ज केला होता. निवडीवेळी सुनील मिस्तरी व सुधाकर जाधव यांचा सत्कार करण्यात आला
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भडगाव सहाय्यक निबंधक महेश कासार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अविनाश पाटील, व भाऊसाहेब महाले कार्यालयीन प्रमुख प्रेमसिंग पाटील यांनी काम पाहिले. तसेच नवनिर्वाचित संचालक यशवंत सिताराम सुतार, सुरेश कैलास बोरसे, एकनाथ सुखदेव लोहार, नाना रमेश मिस्तरी, शाम संतोष बागुल, किरण गुलाब देवरे, उज्वला भैयासाहेब हिरे, ज्योती बाळासाहेब मोरे.

यावेळी धनराज शार्दुल, बापूराव शार्दुल, अमोल जगताप, विजय देवरे, संजय शार्दुल, संजय हिरे, शिवाजी शार्दुल, माजी सचिव एस.पी. विसपुते उपस्थित होते.

Exit mobile version