Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

केमिस्ट असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी सातव्यांदा सुनील भंगाळे यांची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मेडिसीन डीलर्स असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी सुनील भंगाळे यांची तब्बल सातव्यांना पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, जळगाव मेडिसीन डीलर्स असोसिएशनची नवीन कार्यकारिणी आज केमिस्ट भवनात झालेल्या सभेत एकमताने निवडण्यात आली. यात मावळते जिल्हाध्यक्ष सुनील भंगाळे यांच्यावर पुन्हा एकदा अध्यक्षपदाची जबाबदारी सुपुर्द करण्यात आली आहे. ते तब्बल सलग सातव्यांदा या पदावर विराजमान झाले आहेत.

याच कार्यक्रमात उर्वरित कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली. यात उपाध्यक्षपदी कनकमल राका, श्रीकांत पाटील-भुसावळ आणि संदीप बेदमुथा-चाळीसगाव यांची निवड झाली आहे. संघटनेच्या सचिवपदी अनिल झंवर यांची निवड झालेली आहे. तर सहसचिव म्हणून ब्रजेश जैन, रूपेश चौधरी व संजय नारखेडे यांना जबाबदारी मिळाली आहे. कोषाध्यक्ष म्हणून शामकांत वाणी; संघटन सचिव म्हणून संजय तिवारी; सह संघटन सचिव म्हणून मनीष पाटील-पारोळा; पीआरओ म्हणून स्वप्नील रडे यांची नियुक्ती झाली आहे. तर कार्यकारिणी सदस्यांमध्ये दिनेश मालू, नरेंद्र मंधान, पंकज पाटील, खलीदभाई शेख आणि सुनील महाजन-चोपडा यांची निवड करण्यात आली आहे.

नवीन कार्यकारिणी तीन वर्षांसाठी निवडण्यात आलेली आहे. सुनील भंगाळे यांनी तब्बल सातव्यांदा अध्यक्षपदी विराजमान होऊन नव्या विक्रमाची नोंद केलेली आहे. नवनियुक्त कार्यकारिणीचे सर्व केमीस्ट बांधवांकडून कौतुक होत आहे. आजच्या बैठकीला जिल्ह्यातील सुमारे दीड हजार औषधी विक्रेत्यांची उपस्थिती होती.

Exit mobile version