Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुखबीर संधू, ज्ञानेश कुमार होणार नवे निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नवीन निवडणूक आयुक्तांची नियुक्ती झाली आहे. सुखबीर संधू, ज्ञानेश कुमार नवे निवडणूक आयुक्त असतील. ही माहिती विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली. हा निर्णय त्रिसदस्यीय समिती घेतला आहे. त्रिसदस्यीय समितीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश होता. निवडणूक आयोगाच्या नियुक्तीसाठी समितीच्या या आधीही बैठका झाल्या होत्या. आज दोन नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

अधीर रंजन चौधरी म्हणाले की, भारताचे सरन्यायाधीस या समितीमध्ये असायला हवे होते. मागील वर्षी सरकारने केलेल्या कायद्यामुळे ही समिती एक औपचारिकता ठरली आहे. समितीमध्ये सरकारचे बहुमत आहे. त्यामुळे त्यांना हवे ते करु शकतात. तीस सदस्य असलेल्या या समितीमध्ये निवडणूक आयुक्तांच्या नावांची बहुमताने निवड होत असते. दोन सदस्यांनी मंजुरी दिलेल्या नावाची निवड होत असते. काँग्रेस नेत्याने सांगितलं की, मला काल रात्री २१२ नावे देण्यात आली होती. मी काल रात्री दिल्लीत पोहोचलो आणि आज दिल्लीत दोन वाजता बैठक झाली. एका दिवसात इतक्या सर्व नावांचा तपास कसा केला जाऊ शकतो? मला बैठकीआधी सहा नावे सोपवण्यात आली. बहुमत त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांना हव्या त्या उमेदवारांची त्यांनी निवड केली आहे.

Exit mobile version