Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सुकलेले झाड कोसळल्याने दोन रिक्षांचे नुकसान; तिघे बचावले

Riksha news

जळगाव प्रतिनिधी । शहरातील बीएसएनएल कार्यालयाजवळील रिक्षा स्टॉपजवळ उभे झाड अचानक कोसळल्याने उभ्या असलेल्या दोन रिक्षांचे नुकसान झाले असून दोन जणांना किरकोळ जखम झाली आहे.

याबाबत माहिती अशी की, बीएसएनएल कार्यालयाजवळील आर.एच.अग्रवाल यांच्या हॉस्पीटलजवळ रिक्षा स्टॉप जवळ रिक्षा क्रमांक एमएच 19 व्ही 8999 आणि एमएच 19 जे 5764 या दोन रिक्षा उभ्या होत्या. त्यावेळी स्टॉपजवळ उभे झाला अचानकपण कोसळल्याने दोन्ही रिक्षांचे नुकसान झाले असून रिक्षाजवळ उभे असलेले सागर नामदेव पाटील , श्याम अरूण पाटील दोन्ही रा. टेलीफोन कॉलनी आणि सुनिल पवार रा. इंद्रप्रस्थनगर आणि रिक्षा चालक विकास अरविंद अडकमोल रा. इच्छादेवी हे सर्व थोडक्यात बचावले. यात श्याम पाटील याच्या डोक्याला किरकोळ जखम झाली आहे. बाजूबाजूच्या नागरीक व तरूणांनी धाव घेवून रिक्षावर पडलेले झाड बाजूला केले.

Exit mobile version