Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : राज यांना ईडीच्या नोटीसीमुळे मनसे कार्यकर्त्याची आत्महत्या

manse karyakarta pravin chaughule

मुंबई प्रतिनिधी । राज ठाकरे यांना ईडीने नोटीस दिल्यामुळे एका मनसे कार्यकर्त्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना रात्री घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, कळवा येथे राहणार्‍या प्रविण चौगुले याने स्वत:ला पेटवून घेत रात्री आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी प्रविणने त्याच्या काही मित्रांना एक मेसेज पाठवला होता. राज ठाकरे यांना पाठवण्यात आलेल्या ईडीच्या नोटीसमुळे आपण दुखावलो आहोत. त्यांना आता चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे, अशा आशयाचा मेसेज त्यानं केला होता. या नंतर त्याने स्वत:ला पेटवून घेतले. प्रवीण हा दरम्यान, प्रविण हा मनसेचे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जात होता.
कोहिनूर मिल प्रकरणी राज ठाकरे यांना २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नोटीसीमुळे मनसैनिक संतप्त झाले असतांना ही दुर्घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Exit mobile version