Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

परसाळे येथील तरुणाची आत्महत्या

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील परसाळे येथील एका आदीवासी तरूणाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे.  

यासंदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील परसाळे या गावात राहणारा वसीम युनुस तडवी वय २२ वर्ष या तरूणाने दिनांक २७ ऑक्टोबर रोजी परसाळे येथील आपल्या राहत्या घरात १८:४५ वाजेच्या सुमारास घरातील छताच्या लाकडी खांबास दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या करून आपली जिवनयात्रा संपवली आहे . या बाबत मयताचे काका शरिफ रशीद तडवी यांनी पोलीसात खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , घटनेचा तपास पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अस्लम खान दिलावर खान हे करीत आहेत. या तरूणाने आत्महत्या का केली हे मात्र समजु शकले नाही. यावलच्या ग्रामीण रुग्णालयात त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ .बी.बी.बारेला यांच्या हस्ते करण्यात आले.

Exit mobile version