Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गाझियाबादमध्ये सामुहिक आत्महत्या ; दोन पत्नींसह पतीने संपवले जीवन

 

suside

 

गाझियाबाद (वृत्तसंस्था) एका सामुहिक आत्महत्येने गाझियाबादमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आठव्या मजल्यावरून उडी मारून दोन पत्नींसह पतीने संपवले जीवन संपवले आहे. धक्कादायक म्हणजे आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या दोन मुलांचा गळा दाबून खूनही केला.

आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव गुलशन वासुदेव असे आहे. गुलशनला दोन पत्नी होत्या. त्या दोघींसह त्याने आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. परवीन, संजना आणि गुलशन या तिघं जागीच मयत झाले. तर घरात सापडलेल्या मुलांची नावं रितिक आणि रितिका आहेत. गुलशन यांच्या घरात सापडलेल्या सुसाईड नोटच्या आधारे सध्या तपास करत असून काही महत्त्वाची माहिती हाती लागण्याच्या प्रयत्नांत आहेत.

Exit mobile version